
अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार ; एमआयडीसी परिसरातील घटना
अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार ; एमआयडीसी परिसरातील घटना
जळगाव प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरातील गुणीला कंपनी आणि एमएसईबी ऑफिसजवळ रात्रपाळीवर कामावर जात असलेल्या ६४ वर्षीय वृद्धाला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वासुदेव दशरथ सानप (वय ६४, रा. श्रीराम मंदिर चौक, मेहरुण, जळगाव) असे अपघातात मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते सायकलने कामावर जा-ये करत होते. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजेच्या दरम्यान वासुदेव सानप हे नेहमीप्रमाणे त्यांच्या कंपनीत रात्रपाळीवर जात होते. एमआयडीसी परिसरातील गुणीला कंपनी आणि टरएइ ऑफिसच्या जवळून जात असताना, मागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनचालकाने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. धडकेमुळे सायकलचे मोठे नुकसान झाले, तसेच वासुदेवसानप यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात घडवून आणल्यानंतर माणुसकीशून्य झालेल्या अज्ञात वाहनचालकाने जखमी वासुदेव सानप यांना कोणतीही मदत न करता आणि पोलिसांना खबर न देता घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी मयताचे मुलगा गिरीष सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ हे करत आहेत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम