
अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार चिवडाविक्रेत्याचा मृत्यू
अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार चिवडाविक्रेत्याचा मृत्यू
अजंदे फाट्यावर अपघात; गुन्हा दाखल
रावेर प्रतिनिधी ऐनपूर येथे चिवडा विक्री करून सायकलवरून घरी परतणाऱ्या एका व्यावसायिकाचा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात अनिल जवाहरलाल मिश्रा (वय ५५, रा. भोर स्टेशन) यांचा मृत्यू झाला असून ही घटना दि. २० रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास अजंदे फाट्याजवळ घडली.
अपघातानंतर मिश्रा हे रस्त्यालगत गंभीर अवस्थेत पडलेले आढळून आले. त्या वेळी मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, पोलिस व मिश्रा कुटुंबीयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मयताच्या मुलगी शीतल तायडे यांनी दोन दिवसांच्या विलंबानंतर रावेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अपघातास कारणीभूत वाहनाचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम