अज्ञात वाहनाने तरुणाला चिरडले !

वाघोदा येथील घटना

बातमी शेअर करा...

अज्ञात वाहनाने तरुणाला चिरडले !
वाघोदा येथील घटना

रावेर (प्रतिनिधी): दुचाकीवर जाणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना वाघोदा येथील श्री शनी मंदिराजवळ घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मृत तरुणाचे नाव कपिल अशोक वारके (वय ३३, माऊली मेडिकल, निंभोरा, ता. रावेर) असे आहे. ते निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक ए. एच. वारके यांचे सुपुत्र होते आणि निंभोरा येथे मेडिकल व्यवसाय चालवत होते.

कपिल वारके हे सावद्याहून निंभोरा येथे परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर रावेर येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

या घटनेचा तपास सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गर्जे व त्यांचे सहकारी करत आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.कपिल वारके यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम