अटक – कासव विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या ३ आरोपींना अटक

गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने केला गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

बातमीदार | बुधवार दि ७ फेब्रुवारी २०२४

कासव विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या ३ आरोपींना अटक

गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने केला गुन्हा दाखल

जळगांव – येथील वनविभागाने वरिष्ठांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नशिराबाद येथे कासव विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या ३ आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी की, नशिराबाद येथील संजय श्रावण कोळी, भुषण संजय कोळी व अकबर अली मेहमुद अली सर्व रा. नशिराबाद

हे तिन्ही आरोपी वन्यप्राणी कासव-3 नग (Indian SoftShell Turtle -1) (Indian Flapshell Turtle- 2) ची तस्करी करुन विक्री करताना 3 आरोपींना विक्रीच्या उद्देशाने वाहतुक करतांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.

अटक

 

Wildlife Crime Cantrol Beuro New Delhi यांचेकडुन प्राप्त माहीतीनुसार सदर वन्यप्राणी कासव हे अज्ञात इसमाकडुन विक्री करण्यात येणार असलेबाबत माहीती उपसंचालक WCCB New Delhi यांचेकडुन उपवनसंरक्षक जळगांव यांना मिळाली होती.

त्याअनुषंगाने काही दिवसांपासुन सदर व्यक्तीवर पाळत ठेवण्यात आली होती. त्याअनुषंगाने बुधवार दि.07.02.2024 रोजी 3 आरोपी नामे 1) संजय श्रावण कोळी 2) भुषण संजय कोळी 2) अकबर अली मेहमुद अली सर्व रा. नशिराबाद यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

सदर आरोपीवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनगुन्ह्यात पकडण्यात आलेले तीन कासव हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या सुची-1 मध्ये येत असुन सदर कृत्य हे दंडनिय अपराध आहे.

सदर कार्यवाही ही योगेश वरकड, उपसंचालक Wildlife Crome Cantrol Beuro New Delhi, प्रविण ए. उपवनसंरक्षक, जळगांव व सहाय्यक वनसंरक्षक यु.एम. बिराजदार याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

https://youtu.be/d7dE9hdZR14?si=9Ej_umHDNDDkCp8H

सदर अटक कार्यवाही सचीन जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक, वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर, वनपाल योगेश ‍दिक्षीत, वनपाल संदीप पाटील, वनरक्षक भागवत तेली, अजय रायसिंग, हरीष थोरात, दिपक पाटील, गुलाबसिंग ठाकरे वाहन चालक भगवान चिम यांनी केली.

Also Read:

https://www.facebook.com/share/p/tYc8UiPiKXxkgqCn/?mibextid=oFDknk

सदर कार्यवाहीत विवेक देसाई, मानद वन्यजीव रक्षक जळगांव व उमेश पाटील, अध्यक्ष Biologist ideol organization, जळगांव यांच्या उपस्थित पार पाडली.

सदर गुन्हयातील पुढील चौकशी यु.एम.बिराजदार सहाय्यक वनसंरक्षक, जळगांव व नि.अ.बोरकर वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगांव (प्रा.) करित आहे.

हे ही वाचा👇

बरखास्त – …..अखेर बालकल्याण समिती बरखास्त

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम