अट्टल मोटारसायकल चोरटे जेरबंद; २.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बातमी शेअर करा...

अट्टल मोटारसायकल चोरटे जेरबंद; २.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

भडगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या अट्टल टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने केला असून, तीन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून भगवान ऊर्फ लंगड्या सिताराम करगळ (रा. सोनगाव, ता. मालेगाव) व त्याचे साथीदार आकाश गोविंद गायकवाड (रा. जळगाव फाटा, ता. निफाड) आणि दादु संजय सोनवणे (रा. दरेगाव, ता. मालेगाव) यांना विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली. तीनही आरोपींनी चाळीसगाव शहर व तालुक्यातून मोटारसायकल चोरी केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

पोलिसांनी तिघांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेल्या चार मोटारसायकलींचा तपशील दिला.

त्यानुसार, आरोपींकडून एकूण २,४५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पुढील तपासासाठी आरोपींची रवानगी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

भगवान करगळ हा अट्टल गुन्हेगार असून, जळगाव, नाशिक, आणि धुळे जिल्ह्यांत दरोडा, जबरी चोरी व अन्य गंभीर स्वरूपाचे १३ गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, व स्थानीक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक शेखर डोमाळे आणि त्यांच्या पथकाने केली. पथकात पो.ह. मुरलीधर धनगर, पो.ना. महेश पाटील, पो.का. भूषण शेलार, सागर पाटील, मिलिंद जाधव, दीपक चौधरी व भारत पाटील यांचा समावेश होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम