अडावदजवळ रिक्षा उलटली; प्रौढ जागीच ठार, तिघे जखमी

बातमी शेअर करा...

अडावदजवळ रिक्षा उलटली; प्रौढ जागीच ठार, तिघे जखमी

अडावद, ता. चोपडा येथील नूतन विद्यालयाजवळ रिक्षा उलटल्याने प्रवासी प्रौढ जागीच ठार झाला तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अंकलेश्वर ते ब-हाणपूर महामार्गावरील अडावदजवळ नूतन विद्यालय पसिस्रात रस्त्यावरील गतिरोधकावर  २३ रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास रिक्षा (एमएच- १९, एएक्स- १५६२) जागीच उलटली. या दुर्दैवी अपघातात रिक्षामधील प्रवासी सुभाष यादव पाटील (वय ५२) हे जागीच ठार झाले. तर चोपडा तालुक्यातील लोणी येथील कांतीलाल भिला पाटील (वय ३५), शांताराम वना कोळी (५४) व बाळू वामन ठाकूर (वय ५५) हे जखमी झाले आहेत.

जखमींना तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम