
अडावद येथील महाजन विद्यालयात जागतिक बाल मजुरी विरोधी दिन साजरा
अडावद येथील महाजन विद्यालयात जागतिक बाल मजुरी विरोधी दिन साजरा
अडावद ता.चोपडा l प्रतिनिधी
येथील शामराव येसो महाजन विद्यालयात जागतिक बाल मजुरी विरोधी दिन साजरा करण्यात आला. बालकांना त्यांच्या शिक्षणावर लक्ष देण्याची आवश्यकता असतांना त्यांना कामावर पाठवणे हा गुन्हा आहे. असे प्रतिपादन मुख्याध्यापक आर. के पिंपरे यांनी व्यक्त केले.
१२ रोजी सकाळी १० वाजता श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था अडावद संचलित शामराव येसो महाजन विद्यालयात झालेल्या जागतिक बाल मजुरी विरोधी दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. के पिंपरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल ॲफ्रो बीसीसीआय संस्थेचे कृषी मित्र समाधान धनगर, कृषिमित्र कैलास गवळी हे होते. यावेळी समाधान धनगर यांनी मुलांना प्रेम आणि काळजीची गरज असते, बालमजुरी ही न्याय्य गोष्ट नाही. मुलाला पैसे नाही तर ज्ञान मिळवू द्या. बालमजुरीवर बंदी घालावी, बालपण म्हणजे शिकणे, कमाई नाही असे मत व्यक्त केले.
यावेळी विठ्ठल ॲफ्रो तर्फे उपस्थित विद्यार्थ्यांना चित्रकला वही व पेन्सिल असे शालेय उपयोगी साहित्य वितरीत करण्यात आले.
यावेळी उपशिक्षक एम.एन. माळी, पि. आर. माळी, एस बी. चव्हाण, एस. के. महाजन, पि.एस. पवार, व्हि.एम.महाजन. सी.एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, कैलास महाजन, अशोक महाजन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पि.आर. माळी यांनी व्यक्त केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम