
अडावद येथे विद्यार्थ्यांनी दिला वृक्षारोपणाचा संदेश : वृक्षदिंडित ग्रामपंचायत प्रशासनाचा सहभाग
अडावद येथे विद्यार्थ्यांनी दिला वृक्षारोपणाचा संदेश : वृक्षदिंडित ग्रामपंचायत प्रशासनाचा सहभाग
अडावद ता. चोपडा येथे ’मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या गजरात वृक्षदिंडी काढली. याद्वारे विद्यार्थ्यांनी वृक्षारोणाचा संदेश घरोघरी पोहोचवला.
१७ रोजी सकाळी १० वाजता श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालय व आदर्श प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी काढली. महाराष्ट्र शासनच्या ग्रामविकास विकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद, जळगाव ’मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ याचा शुभारंभ ग्रामपंचायत अडावद तर्फे करण्यात आला. या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २५ पर्यंत आहे यात विद्यार्थ्यांनी काढलेल्या रॅलीत ’प्रत्येकाचा एक संकल्प दरवर्षी एक वृक्ष..!’, ’ आज लावलेले झाड उद्या जीवनाचा आधार…!’ व या अभियानाचा शुभारंभ १७ रोजी रोजी वृक्ष लागवड करुन करुया…। अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्यात. वृक्षदिंडी ढोल ताशांच्या गजरात शाळेतून वना दाजी नगर, दुर्गादेवी मंदिर चौक, सुभाष चौक, महात्मा फुले रोड, नेवे नगर, लोखंडे नगर, चामुंडा नगर, के. टी. नगर मार्गे परत शाळेत अशी निघाली. इयत्ता १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या संचालनाची जबाबदारी पार पाडली.
या रॅलीत उपसरपंच संदीप महाजन, विकासोचे संचालक सचिन महाजन, संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेव महाजन, मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, मुख्याध्यापक डी.बी.महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपशिक्षक एन. ए. महाजन, व्हि.एम.महाजन, एस. जी. महाजन, एम. एन. माळी, पि.आर.माळी, एस. बी. चव्हाण, एस.के . महाजन, पि.एस.पवार, एस. टी.महाजन, आर.जे. महाजन, वाय. एल. साळुंखे, डि. आर. वाघ, कामिनी चौधरी, लिपिक सी.एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, अशोक महाजन, कैलास महाजन आदींनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम