अति मोबाईलच्या वापरामुळे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम यावर सादरीकरण

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये प्रात्यक्षिक सादर

बातमी शेअर करा...

अति मोबाईलच्या वापरामुळे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम यावर सादरीकरण

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये प्रात्यक्षिक सादर
जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागात दिनांक 1 / 3/25 रोजी “अति मोबाईलच्या वापरामुळे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम “ही ऍक्टिव्हिटी नर्सरी जुनियर व सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या समुपदेशिका सौ चंचल रत्नपारखी यांनी घेतली.

मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम कसे होतात. हे प्रात्यक्षिक द्वारे दाखविण्यात आले . तसेच एकाच वेळी अनेक पडद्यांसह खेळणे त्यांच्या मेंदूसाठी आणि शाळेच्या कामासाठी वाईट असू शकते हे त्यांना दाखविण्यात आले व मुलांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी ही ऍक्टिव्हिटी घेण्यात आली. या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये विद्यार्थ्यांकडून आनंदाने प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षिका स्मिता राव या हजर होत्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम