
अत्यंत अडचणीच्या व गैरसोयीच्या चोपडा टपाल कचेरीत ग्राहक हैराण
अत्यंत अडचणीच्या व गैरसोयीच्या चोपडा टपाल कचेरीत ग्राहक हैराण
चोपडा ( प्रतिनिधी) शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलातील टपाल कचेरीत प्रवेशद्वारा शेजारीच दुचाकी वाहनांची पार्किंग असून यामुळे ग्राहकांना कचेरीत जाण्या येण्यास कसरत करावी लागते.
चोपडा टपाल कचेरीत पोस्ट पेमेंट बँक, स लग्न असली तरी तिला बँक म्हणावे की, उघड्यावरचा संसार असा संभ्रम निर्माण होत आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, पंतप्रधान सन्मान निधी, वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन, या प्रकारची पेमेंट पोस्टाद्वारे ग्राहकांना केली जातात, परंतु टपाल कचेरी अनेक समस्यांचे माहेरघर झाले आहे.
सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत पोस्टातला एक कर्मचारी पोस्ट पेमेंट बँकेचे संलग्न ग्राहकांना उघड्यावर बसून पेमेंट वाटप करतो समोर एक टेबल ठेवलेला असतो. यावर मर्यादित वेळेत तो पेमेंट वाटप करताना दिसतो. याला कसलेही काळाचे व वेळेचे बंधन नसल्याचे दिसते? स्थानिक पोस्ट मास्तर व इतर कर्मचारी या पोस्ट पेमेंट बँकेला नाहकची डोकेदुखी समजतात? परिणामी ग्राहकांची ससे होलफट होते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारभारात सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम