
अधीक्षक अभियंताचे ठेकेदारांना अभय – ॲड. सतीश मोरे
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
जळगांव प्रतिनिधी
अधिकारी हे जनतेसाठी काम करीत नसून ते ठेकेदारांसाठी काम करते आहे का ? असा प्रश्न माध्यमांसमोर प्रजशक्ती क्रांती दलाचे राज्य सचिव ॲड. सतीश मोरे यांनी उपस्थित केला दोन वर्ष झालीत महारष्ट्र राज्य विद्युत वितरण च्या जळगांव येथील अधीक्षक अभियंता यांना तक्रार अर्ज देऊन परंतु त्याची साधी दखल हि घेतली जात नाही जर एखाद्या संघटनेच्या तक्रार अर्जाची महावितरण कडून दखल घेतली जात नसेल तर एखाद्या सामान्य व्यक्तीच्या तक्रार अर्जाचे काय असा प्रश्नही ह्या निम्मिताने उपस्थित होतो.
दुई तालुका मुक्ताईनर येथील सबस्टेशन चे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच माहिजी तालुका पाचोरा येथील सबस्टेशन कडून दहिगाव कडे टाकण्यात आलेली नवीन विद्युत पोलचे काम हि अतिशय निकृष्ट झाले आहे. ह्या विषय दोनदा तक्रार अर्ज देऊन ही दोन वर्षात कुठलीच कार्यवाही त्याठिकाणी होत नाही.
विशेषताः ज्या वेळेस तक्रार अर्ज घेऊन जातोत त्या वेळेस अधीक्षक अभियंता हे उपस्थित नसतात तर त्यांच्या वतीने निवेदन हे अभियंता खंडारे हे स्वीकारतात आणि त्यानंतर त्यांचा प्रश्न असतो कार्यवाही कोणावर करायची. तक्रार देऊन हि कार्यवाही कोणावर करायची हा प्रश्न जर महावितरण च्या अभियंतांना पडत असेल तर त्यांचाच अभय हा ठेकेदारांना आहे ह्या वरून स्पष्ट होते. असे मत निवेदन दिल्यानंतर ॲड. सतीश मोरे यांनी उपस्थित केले लवकरच दोषींविरुध्य कार्यवाही न केल्यास मुख्यमंत्र्यांकडे आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलन करू असेही ते यावेळी बोलले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम