अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात जळगावात जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

बातमी शेअर करा...

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात जळगावात जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

जळगाव,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारीत अधिनियम 2016 बाबत जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा मंगळवार, दि. 29 जुलै 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे होणार आहे. कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी जळगाव यांच्या मान्यतेने करण्यात आले असून, यात विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.

या कार्यशाळेमध्ये महसूल व वन विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी (प्रांत), तहसीलदार, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्य, गृह विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, नागरी हक्क संरक्षण शाखेतील अधिकारी/कर्मचारी, विधी व न्याय विभागातील मा. जिल्हा सरकारी अभियोक्ता, ग्रामविकास विभागातील गटविकास अधिकारी (बीडीओ), आरोग्य विभागातील जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना प्रशिक्षणासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणातून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत अधिकाधिक जाणीव, समज आणि अंमलबजावणीतील प्रभावीता वाढवणे, जातीय सलोखा आणि सामाजिक समतेचा संदेश पसरवणे, हा उद्देश असून, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यशाळेला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन प्र. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नंदा रायते आणि बार्टी पुणेचे प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम