बातमीदार | दि ९ जानेवारी २०२४
अनेर परीसरात ५ कोटी ६६ लाखाच्या कामांचे थाटात आ. सौ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते भुमिपुजन
चोपडा पासून जवळच असलेल्या अनेर परीसरात तालुक्याच्या भाग्य विधात्या आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन व माजी कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी
चोपडा तालुक्यातील कुसुंबा ते अंजतीसिम १० कि.मी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ कोटी रु.निधीतुन
वढोदा येथे पाणी पुरवठा योजनेतुन गावासाठी १ कोटी २८ लाखाच्या पाण्याची टाकी व पाईप लाईन साठी कामाचे भुमिपुजन करण्यात आले.
तसेच पाणीपुरवठा योजनेतुन मोहीदा गावासाठी ५९ लाखाचे कामाचे भुमिपुजन व अंजतीसिम येथे पाणी पुरवठा योजनेतुन ३९ लाखाची पाणीपुरवठा योजनेचे भुमिपुजन
विटनेर येथे ४८लाखाची पाणी पुरवठा कामाचे भुमिपुजन करण्यात आले.
त्याप्रंसगी अनेर परीसरातील कुसुंबा, अंजतीसिम, वढोदा, मोहीदा, विटनेर व तापी परीसरासाठी नविन वर्षाची फार मोठी भेट असुन संपूर्ण तापी अनेर परीसरात आनंदाचे वातावरण दिसुन आले.
तापी व अनेर परीसरात स्वच्छ पाणि व उत्कृष्ट रस्ता होत असतांना नागरीकांनी लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार आण्णासाहेबांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.
त्याप्रंसगी कृउबा सभापती नरेद्र पाटील, संचालक विजय पाटील, गोपाल पाटील, किरण देवराज, रावसाहेब पाटील व राजेद्र पाटील फौजी नाना कैलास बाविस्कर, गणेश पाटील, एम व्ही पाटील माजी – उपसभापती, गोपाल चौधरी,
किशोर कोळी, मंगल इंगळे, डाॕ पवन पाटील, बापुजी कोळी, सौ शितलताई देवराज, संरपच सौ मंगलाताई पाटील, महीला आघाडी ता. प्रमुख तसेच तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी, परीसरातील युवासैनिक व शिवसैनिक उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम