आयुष्या मध्ये अपयश पचवणे सोपे परंतू यश पचवणे कठीण – जनार्दन हरीजी महाराज

योगराज फाउंडेशन मुक्ताईनगर, यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गौरव

बातमी शेअर करा...
आयुष्या मध्ये अपयश पचवणे सोपे परंतू यश पचवणे कठीण – जनार्दन हरीजी महाराज
योगराज फाउंडेशन मुक्ताईनगर, यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गौरव
सावदा l प्रतिनिधी
 आयुष्यामध्ये अपयश पचवणे सोपे आहे परंतु, यश पचवणे कठीण आहे आणि ज्यांना यश पचवता आलं ते खुप यशस्वी झाले आहेत हे दिसून येते.
आजकाल आपल्या विद्यार्थ्यांचे थोडे जरी कौतुक झाले की त्यांचे पाय जमिनीवर राहत नाही आणि तिथूनच आपली संपायला सुरुवात होते. असे मत जनार्दन हरी जी महाराज यांनी व्यक्त केले.
 योगराज फाउंडेशन मुक्ताईनगर, यांचे वतीने सावदा येथे आयोजित गौरव गुणवंतांचा या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, अभिनेत्री किशोरी शहाणे, हास्य कलाकार भारत गणेशपुरे, सुरेशराज शास्त्री, विनोद सोनवणे,
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे.के. पाटील, ललित चौधरी, कोचुर येथील प्रगतीशील शेतकरी सुनील पाटील, प्रमोद सोनवणे, रवींद्र महाजन उपस्थित होते.
महाराष्ट्राची चित्रपट सृष्टी ही देशभरात आदर्शवत आहे. त्याचं ताजं उदाहरण जर बघायचं झालं तर किशोरी शहाणे आणि भारत गणेशपुरे यांच्यासारखे कलाकार आपली संस्कृती टिकून ठेवून आहेत.
आपल्या मराठी चित्रपट सृष्टी कडून पुढच्या पिढीने आदर्श घ्यावा अशीच आपली कलाकार आहेत. असेही ते म्हणाले. तर किशोरी शहाणे म्हणाल्या विद्यार्थ्यांनो आपल्यामध्ये आत्मविश्वास खूप गरजेचा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम