
‘अपराजिता संपूर्णा’ उपक्रमाअंतर्गत स्त्री आरोग्यावर केंद्रित चर्चासत्र संपन्न
‘अपराजिता संपूर्णा’ उपक्रमाअंतर्गत स्त्री आरोग्यावर केंद्रित चर्चासत्र संपन्न
जळगाव (प्रतिनिधी) – एफओजीएसआयच्या ‘अपराजिता संपूर्णा’ उपक्रमाअंतर्गत जळगाव ऑब्स्टेट्रिक अँड गायनाकॉलॉजिकल सोसायटीतर्फे स्त्री आरोग्यविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राचे नेतृत्व संस्थेच्या अध्यक्ष डॉ. वैशाली चौधरी आणि सचिव डॉ. अनिता बाविस्कर यांनी केले.
एफओजीएसआयच्या अध्यक्ष डॉ. सुनीता तान्दुळवडकर यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या चर्चासत्रात महिलांच्या आरोग्याच्या विविध पैलूंवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रात ‘पीसीओएस व्यवस्थापन’ या विषयावर डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सखोल विवेचन केले, तर प्रजनन आरोग्यासाठी प्लेसेंटा एक्स्ट्रॅक्टचे महत्त्व या विषयावर डॉ. ज्योती बंगलोवाला यांनी माहिती दिली.
स्त्री जीवनातील विविध टप्प्यांमध्ये अमिनो अॅसिड सप्लिमेंटेशनचे महत्त्व या विषयावर डॉ. सीमा पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. राजश्री सादुलवाड, डॉ. वंदना चौधरी आणि डॉ. भावना चौधरी यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रियंका चौधरी यांनी केले.
या चर्चासत्रात सुमारे ३० स्त्रीरोग तज्ज्ञांनी सहभाग घेत स्त्री आरोग्यासंबंधित आधुनिक उपचार पद्धती, संशोधन आणि अनुभवांची देवाणघेवाण केली.
हा उपक्रम ‘अपराजिता संपूर्णा’च्या माध्यमातून महिलांच्या संपूर्ण आरोग्यदृष्टीकोनाला वाव देणारा ठरल्याची भावना सहभागी डॉक्टरांनी व्यक्त केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम