अपहरण झालेल्या अल्पवयीन पाच मुले-मुलींचा शोध

रावेर पोलिसांची यशस्वी कारवाई

बातमी शेअर करा...

अपहरण झालेल्या अल्पवयीन पाच मुले-मुलींचा शोध

रावेर पोलिसांची यशस्वी कारवाई

रावेर प्रतिनिधि

रावेर पोलीस ठाणे हद्दीत अलिकडच्या काळात अज्ञात इसमाने अल्पवयीन मुले व मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणांचा तपास करत असताना पोलीस दलाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे अत्यंत कसून तपास केला.

या तपासाअंती, अपहरण झालेली दोन मुले व दोन मुली यांचा ठावठिकाणा टिकिरी, ता. माकपदारा, जि. रायगड (ओडिशा) येथील जंगलामध्ये लागला. त्यानुसार गु.र.नं. १४८ व १४९ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) नुसार कारवाई करत त्यांना सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.

तसेच, गु.र.नं. १३१ मध्ये दाखल गुन्ह्यातील एक अल्पवयीन मुलगी इंदूर (म.प्र.) येथून तर गु.र.नं. १४३ अंतर्गत असलेल्या एका मुलीचा शोध नायर, ता. खकनार, जि. बुऱ्हाणपूर (म.प्र.) येथून लावण्यात आला. सर्व अपहरण झालेल्या मुला-मुलींना सुखरूप रावेर येथे आणून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

ही यशस्वी कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे व रावेर पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील, दिपाली पाटील, पोहेकॉ. ईश्वर चव्हाण, सुनिल वंजारी, पो.कॉ. सचिन घुगे, नितीन सपकाळे, श्रीकांत चव्हाण, तसेच स्थागुशा जळगाव येथील पो.कॉ. गौरव पाटील यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम