अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली आदेशाला प्रशासकीय कारणास्तव स्थगिती

राज्यपाल आणि अवर सचिवांचे आदेश जारी

बातमी शेअर करा...

अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली आदेशाला प्रशासकीय कारणास्तव स्थगिती

राज्यपाल आणि अवर सचिवांचे आदेश जारी

जळगांव, प्रतिनिधी ;- सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली आदेशाला प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या नव्या शासन आदेशानुसार, हा निर्णय दि. १५ एप्रिल २०२५ पर्यंत लागू राहील.

संदर्भानुसार, श्री. सोनवणे यांची जळगांव येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून नगरपरिषद प्रशासन संचालनालय, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली होती. हा आदेश १८ मार्च २०२५ रोजी जारी झाला होता. मात्र, नव्या शासन आदेशान्वये (क्र. बदली-१२२४/प्र.क्र.९१/सेवा-१, दि. १८.०३.२०२५) ही बदली तात्पुरती थांबविण्यात आली आहे.

शासनाने स्पष्ट केले की, हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध असून, त्याचा संकेतांक २०२५०३२७१११२१२९६१८ आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात आला आहे.

सदर निर्णय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि अवर सचिव द. व. खारके यांच्या नावाने जारी करण्यात आला आहे. या स्थगितीमुळे प्रशांत सोनवणे हे सध्या जळगांव येथेच आपल्या पदावर कार्यरत राहतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम