
अमळनेर नगर परिषदेची प्लास्टिक बंदीबाबत धडक कारवाई
चार दुकानदारांना एकूण ६ हजार रुपयांचा दंड
अमळनेर नगर परिषदेची प्लास्टिक बंदीबाबत धडक कारवाई
चार दुकानदारांना एकूण ६ हजार रुपयांचा दंड
अमळनेर प्रतिनिधी I
प्लास्टिक बंदीबाबत नगर परिषदेतर्फे १४ रोजी धडक कारवाई करण्यात आली. यात बंदी असलेल्या प्लास्टिकपासून बनवलेल्या पतंगांची विक्री, वापर व साठवणूक केल्याप्रकरणी चार दुकानदारांना एकूण ६ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या भरारी पथकाने एकूण ८.५ किलोच्या प्लास्टिक पतंग जप्त केल्या आहेत. अमळनेर नगर परिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाकडून मंगळवारी दुपारी शहरातील एम. एस. किरणा, धर्मेंद्र कटारिया, जुने बस स्टॅन्ड परिसर, महेश कटलरी, गंगा घाट, बाफना जनरल स्टोअर्स, सराफ बाजार परिसर या दुकानातून प्लास्टिक पतंग मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेत. तर बंदी असलेल्या प्लास्टिकपासून बनवलेले
पतंग अमळनेर शहरात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने ही कारवाई मुख्याधिकारी वेवो तोलू केझो यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या मोहिमेची अंमलबजावणी करताना पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे तसेच शहर समन्वयक गणेश गढरी, पथकातील कर्मचारी जया भारत सरदार, योगेश आधार पवार, महेंद्र नाना बिऱ्हाडे, गौतम भावलाल बिऱ्हाडे, अनंत अशोक संदानशिव, शामराव आधार करंदीकर, युनूस शेख आदींचा सहभाग होता. दरम्यान, मुख्याधिकारी वेवो तोलू केझो (भा.प्र.से.) यांनी सर्व नागरिकांना प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर न करण्याचे तसेच कापडी पिशव्यांचा अधिकाधिक वापर करण्याचे अन् नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम