
अमळनेरजवळ ट्रक-दुचाकी अपघात
अमळनेरजवळ ट्रक-दुचाकी अपघात
दोघे दुचाकीस्वार ठार; ट्रक चालक फरार
अमळनेर प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील गलवाडे रस्त्यावर केसरी हॉटेलजवळ २४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही स्वार जागीच ठार झाले.मृत दुचाकीस्वार : ईश्वर आनंदा पाटील आणि समाधान भिकन पाटील (दोन्ही रा. गलवाडे). दुचाकी क्रमांक (MH १९ ED ९५५९) ने हे दोघे अमळनेरकडे जात होते. समोरून येणाऱ्या ट्रकने (RJ १४ GJ ९१३६) त्यांना धडक दिली. अपघातानंतर दोघेही गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तपासणीत डॉक्टरांनी ईश्वर पाटील यांना मृत घोषित केले. समाधान पाटील यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवले असता, तेथे उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालक रुस्तम जैनू (रा. भूतलाका सहसौला, मेवात, हरियाणा) घटनास्थळावरून फरार झाला. मृतांच्या चुलत भावाने विश्वास भगवान पाटील यांच्या तक्रारीवरून मारवड पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम