अमळनेरमध्ये अवैध गॅस भरणा सेंटरचा पर्दाफाश

बातमी शेअर करा...

अमळनेरमध्ये अवैध गॅस भरणा सेंटरचा पर्दाफाश

तिघांना पोलिसांनी रंगेहात पकडले; सिलेंडर व वाहन जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून चारचाकी वाहनात अवैधरित्या गॅस भरताना अमळनेर पोलिसांनी छापा टाकून तिघांना रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. ३० सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता शहरातील मिलचाळ परिसर, बजरंग पॅलेसजवळ करण्यात आली.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गुप्त माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, भूषण परदेशी, सुमित वानखेडे यांच्यासह तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना शेख व सचिन निकम यांना घटनास्थळी पाठवले.

पथकाने छापा टाकला असता, गौरव हरी चौगुले (रा. मिलचाळ), जितेंद्र रवींद्र उदेवाल (रा. गुरुकृपा कॉलनी) आणि एका अल्पवयीन मुलाला इलेक्ट्रिक पंपाच्या सहाय्याने घरगुती गॅस सिलेंडरमधून कार (क्र. MH-54 D-1879) मध्ये गॅस भरताना रंगेहात पकडले.

या कारवाईत गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक पंप व संबंधित वाहन जप्त करण्यात आले आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर पोलिस करत आहेत.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम