अमळनेरमध्ये तरुणाकडून पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर पोलिसांनी गुरुवारी एका १९ वर्षीय तरुणाकडून बेकायदेशीर पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त करत कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची कारवाई केली आहे.

५ जून रोजी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की, अमळनेर क्रीडा संकुलाच्या भिंतीआड एक तरुण अवैधरीत्या शस्त्र बाळगून थांबलेला आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, निलेश मोरे, विनोद संदानशिवसिद्धांत शिसोदे यांना तात्काळ पथक तयार करण्याचे आदेश दिले.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी परिसरात छापा टाकला असता, संशयित तरुण पोलिसांना पाहून पळू लागला. मात्र, सतर्कतेने कारवाई करत त्याला अटक करण्यात आली. झडती घेतली असता, त्याच्याकडे सिंगल बोअरचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस सापडले.

चेतन उर्फ सत्तू किरण धोबी (वय 19, रा. शिवाजीनगर, पैलाड) असे या अटकेत आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून अंदाजे २० हजार रुपये किंमतीचे पिस्टल आणि ५०० रुपयांचे काडतूस जप्त केले आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत. संशयितावर शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून आणखी माहिती मिळवण्यासाठी चौकशी सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम