अमळनेरात पूर्ववैमनस्यातून चाकूहल्ला; १९ जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

अमळनेरात पूर्ववैमनस्यातून चाकूहल्ला; १९ जणांवर गुन्हा दाखल

 

 

पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला

 

अमळनेर : पूर्ववैमनस्यातून सुरू झालेल्या वादानंतर अमळनेरमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेत चाकू आणि लाठीकाठ्यांचा वापर करण्यात आला, ज्यात तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दोन्ही गटांतील एकूण १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

हाणामारीत तिघे जखमी

या वादामध्ये, सनी राजू जाधव, विनोद टिल्लू जाधव आणि छोटू विनोद जाधव यांनी लाठीकाठ्यांनी हल्ला चढवला. नितेश विकास जाधव याने हातातील सुऱ्याने भगत सुनील चिरावंडे यांच्या पोटात वार केला. तसेच, विकास उर्फ बुद्धा टिल्लू जाधव याने राकेश कल्याणे यांच्या हातावर वार करून त्यांना जखमी केले. पल्लू घारू, करण विनोद जाधव, आकाश जगन जेधे आणि राजा सुनील खरारे यांनी नरेश कालू कल्याणे यांच्या डोक्यावर काठीने मारून त्यांना जखमी केले. राजेश पापाराम दाभोळे आणि शक्ती दाभोळे यांनीही इतरांवर हल्ला करून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांची तात्काळ कारवाई

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर, युवराज बागुल, शरद काकळीज आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले आहे.

सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम