अमळनेरात महिलांनी राम मंदिरात साजरी केली ‘दिवाळी पहाट’

बातमी शेअर करा...

अमळनेरात महिलांनी राम मंदिरात साजरी केली ‘दिवाळी पहाट’
अमळनेर, पौराणिक काळापासून दीपावली सणाला हिंदू संस्कृतीत विशेष स्थान आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून अयोध्येत परतल्यानंतर रयतेने रांगोळ्या, हार-तोरणे आणि दीप-पणत्या लावून त्यांचे स्वागत केले होते. हीच परंपरा जपण्यासाठी आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अमळनेर येथील महिलांनी राम मंदिरात ‘दिवाळी पहाट’ उत्साहात साजरी केली.
उत्तर महाराष्ट्र महिला महासंघाच्या अध्यक्षा सौ. शोभा ताई रघुनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला आकार मिळाला. “पहिला दिवा श्रीरामाला” या संकल्पनेला महिलांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी महिलांनी दरवर्षी राम मंदिरात ‘दिवाळी पहाट’ मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी आणि यात अधिकाधिक महिला, मंगळ ग्रह समिती, सामाजिक संस्था, पत्रकार बंधू आणि समाजसेवक-सेविका यांनी सहकार्य करावे, अशी इच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमात रुपाली जोशी, प्रतिमा साळवी, वैशाली चौधरी, स्वाती पोळ, भारती कार्लेकर, सोनाली साळुंखे, दिव्या बडगुजर, नंदा गायकवाड, उज्वला शिरोडे यांच्यासह अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. वृक्षवल्लीच्या अध्यक्षा नीलिमा सोनकुसरे आणि अपेक्षा पवार यांनी विशेष सहकार्य केले. या उपक्रमाने अमळनेरातील सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणाला एक नवा उत्साह प्राप्त झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम