
अमळनेरात मातृशक्ती दुर्गा वाहिनीचा शस्त्रपूजन सोहळा उत्साहात
अमळनेरात मातृशक्ती दुर्गा वाहिनीचा शस्त्रपूजन सोहळा उत्साहात
अमळनेर (प्रतिनिधी) – जय भवानी मित्र मंडळ, झामी चौक येथे दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी विश्व हिंदू परिषद-बजरंग दल यांची महिला संघटना मातृशक्ती दुर्गा वाहिनी तर्फे शस्त्रपूजन विधी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात व श्रद्धेने संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी ५ वाजता मंत्रोच्चार व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर शिस्तबद्ध वातावरणात कार्यकर्त्यांनी शस्त्रांची विधीवत पूजा केली.
या पवित्र प्रसंगी बिल्डर प्रकाश सेठ मुंदडा, व्यापारी लालचंद सैनानी, सुनील सेठ, महेंद्र मेहता, बिल्डर विशाल निकुंभ आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मातृशक्तीच्या कार्यकर्त्यांमध्ये एड. पी. डी. भावसार मॅडम, कपिला मुठे, सीमा शाह यांची विशेष उपस्थिती होती. सर्वांनी एकत्रितपणे शस्त्रपूजनाचे ऐतिहासिक, धार्मिक व नैतिक महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यात सर्व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग लाभला व शस्त्रपूजन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम