अमळनेरात शिंदे गटाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर विजयी

बातमी शेअर करा...

अमळनेरात शिंदे गटाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर विजयी

अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीत येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांचा विजय झाला आहे. डॉक्टर परीक्षित बाविस्कर हे जळगाव येथील आरूश्री हॉस्पिटलचे संचालक असून शिंदे गटातर्फे शिवसेना शिंदे गटातर्फे त्यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली होती. यात त्यांनी विजय प्राप्त केला आहे.

अमळनेर नगरपरिषदेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून नगरराजकारणात तिरंगी चित्र स्पष्ट झाले आहे. एकूण २४ जागांच्या नगरपरिषदेत शहर विकास आघाडी आणि अपक्ष प्रत्येकी ८ जागांवर विजयी झाले असून शिवसेनेने ७ जागांवर यश मिळवले आहे. एका प्रभागात अपक्ष उमेदवाराचा विजय नोंदवला गेला असून काही ठिकाणी अटीतटीच्या लढती रंगल्या.
प्रभाग क्रमांक १ अ मधून शहर विकास आघाडीच्या कविता विजय राजपूत यांनी विजय मिळवला, तर १ ब मधून अपक्ष कैलास नामदेव पाटील विजयी झाले. प्रभाग २ अ मध्ये शहर विकास आघाडीचे कांबळे देवेंद्र भानुदास, तर २ ब मध्ये अफसाना मुक्तार खाटीक यांनी बाजी मारली. प्रभाग ३ अ मधून शोभाबाई भिवसन गढरी आणि ३ ब मधून भरतकुमार सुरेश ललवाणी हे दोघेही शहर विकास आघाडीकडून विजयी झाले.

प्रभाग ४ अ मधून नंदा नरेंद्र संदानशिव (शहर विकास आघाडी) यांनी विजय मिळवला, तर ४ ब मध्ये शिवसेनेचे शेख नाविद अहमद मुशिरोद्दीन निवडून आले. प्रभाग ५ अ मधून शिवसेनेचे श्रीराम भगवान चौधरी, तर ५ ब मधून अपक्ष परदेशी कल्पना भरतसिंग यांनी विजय संपादन केला. प्रभाग ६ अ मध्ये अपक्ष सविता योगराज संदानशिव आणि ६ ब मध्ये अपक्ष चौगुले दीपक हरी विजयी झाले.
प्रभाग ७ अ मधून अपक्ष योगिता सयाजीराव कापडणेकर, तर ७ ब मधून अपक्ष पाटील प्रवीण गंगाराम यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला. प्रभाग ८ अ मध्ये शहर विकास आघाडीचे पाटील सचिन बळवंत हे बिनविरोध निवडून आले, तर ८ ब मध्ये शिवसेनेच्या अपूर्वा जालिंदर चौधरी यांनी विजय मिळवला.

प्रभाग ९ अ मधून शिवसेनेच्या शर्मा कल्पना चंद्रकांत, तर ९ ब मधून शिवसेनेचे चौधरी पंकज पंडित विजयी झाले. प्रभाग १० अ मध्ये शहर विकास आघाडीचे सचिन विभाकर कासार, तर १० ब मध्ये अपक्ष स्वाती सूरजसिंग परदेशी निवडून आल्या. प्रभाग ११ अ मधून अपक्ष पाटील छाया बाळू यांनी विजय मिळवला, तर ११ ब मध्ये शहर विकास आघाडीचे विजय कहारू पाटील विजयी झाले. प्रभाग १२ अ मधून शिवसेनेच्या पुष्पा पंकज भोई, तर १२ ब मधून शिवसेनेचे धनगर सुयोग ज्ञानेश्वर यांनी यश मिळवले.
एकूण निकालानुसार शहर विकास आघाडी – ८, शिवसेना – ७ आणि अपक्ष – ८ असे संख्याबळ स्पष्ट झाले असून नगराध्यक्षपदासाठी पुढील राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. निकाल जाहीर होताच शहरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम