अमळनेरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह

शोभायात्राने संपूर्ण शहराचे वेधले लक्ष

बातमी शेअर करा...

अमळनेरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह 

शोभायात्राने संपूर्ण शहराचे वेधले लक्ष

अमळनेर (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याच्या निमित्ताने अमळनेर शहरात भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रप्रेमी, धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने निघालेल्या या शोभायात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले.

यात्रेच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी आपले प्रांगण स्वच्छ करून रांगोळ्या काढल्या, घरासमोर गुढ्या उभारल्या आणि ठिकठिकाणी फुलांची उधळण करत उत्सवाला रंगत आणली. नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते, तर शोभायात्रेत विविध संस्था आणि समाजांचे आकर्षक सजवलेले रथ सहभागी झाले होते.

यात्रेची सुरुवात प्रताप मिल, स्टेशन रोड येथून झाली. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पूजन आणि पालखी खांद्यावर घेत यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. वाटेत विविध चौकांमध्ये यात्रेचे स्वागत करण्यात आले आणि भाविकांसाठी पाणी व थंड पेयांची व्यवस्था ठेवण्यात आली होती.

शोभायात्रेचा मार्ग – स्टेशन रोड, स्वामी नारायण चौक, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, वाडी चौक, माळीवाडा, झामी चौक, पोलीस चौकी, वड चौक, वाघ बिल्डींग, त्रिकोणी बगीचा, पाचपावली देवी मंदिर, कोंबडी बाजार, विजय शॉपी, पोस्ट ऑफिस, बजरंग सुपर मार्केट मार्गे यात्रा श्री संकटमोचन हनुमान मंदिर, प्रताप मिल येथे रामारोप सोहळ्याने समाप्त झाली.

बजरंगलाल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू नववर्ष स्वागत समितीने या सोहळ्याचे आयोजन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम