अमळनेर तालुक्यातील ८१ जणांना केले हद्दपार

बातमी शेअर करा...

अमळनेर तालुक्यातील ८१ जणांना केले हद्दपार

अमळनेर : गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यात जातीय तणाव निर्माण करणारे व दंगल घडवणाऱ्या ८१ जणांना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या प्रस्तावानुसार अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीसाठी अमळनेर तालुक्यातून हद्दपार केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात जातीय तणाव वाढत असल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि जातीय दंगलीत सहभागी अशा ८३ जणांचा नवरात्र व सणाच्या काळात हद्दपारीचा प्रस्ताव भारतीय न्याय संहिता कलम १६३ (२) प्रमाणे डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्फत अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्याकडे

दंगा करणाऱ्यांची केली जाणार नाही गय

हद्दपारीचे आदेश पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत संबंधितांना देण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त जर कुणी गावात दिसला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच यापुढे गावात दंगा करणाऱ्या किंवा समाजविघातक काम करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही.

– दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक, अमळनेर

पाठवला होता. यावर कविता नेरकर यांनी ८३ पैकी ८१ जणांना २२ रोजी मध्यरात्रीपासून ते ३ ऑक्टोबर पर्यंत तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम