अमळनेर नगरपरिषदेसमोरील दुकानांना भीषण आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

बातमी शेअर करा...

अमळनेर नगरपरिषदेसमोरील दुकानांना भीषण आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर नगरपरिषदेसमोरील दुकानांना बुधवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग इतकी वेगाने पसरली की काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानांमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी लाखो रुपयांचे साहित्य आगीत जळून खाक झाले. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली असावी.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र दुकाने बंद असल्याने आग विझवण्यासाठी शटर तोडावे लागले, त्यामुळे नियंत्रण मिळवताना वेळ लागला. कटलरी साहित्य, पाण्याचे जार, फरसाण व अन्य वस्तू जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आगीमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात सुरक्षेची व्यवस्था केली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.

या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, दुकानांमध्ये वीजपुरवठा सुरू असताना आग लागली, त्यामुळे शॉर्ट सर्किटची शक्यता अधिक आहे. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम