
अरुणामाई फार्मसी महाविद्यालयाला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून एम. फार्मसी अभ्यासक्रमास मान्यता
अरुणामाई फार्मसी महाविद्यालयाला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून एम. फार्मसी अभ्यासक्रमास मान्यता
संस्थाअध्यक्ष आर. जी. नाना पाटील यांचा सत्कार
ममुराबाद : शेलिनो एज्युकेशन सोसायटीच्या अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी, ममुराबाद येथे नुकतीच आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी महाविद्यालयाला एम. फार्मसी (फार्मास्युटिक्स) ९ जागा आणि एम. फार्मसी (क्वालिटी अॅश्युरन्स) ९ जागा या दोन नवीन अभ्यासक्रमांना परवानगी दिली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थाअध्यक्ष नानासाहेब आर. जी. पाटील यांचा महाविद्यालयात विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य, सर्व प्राध्यापकवर्ग, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या यशामुळे जळगाव जिल्ह्यातील फार्मसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध झाली आहे.
नानासाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्थेच्या वतीने असे नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू.” महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आणि प्राध्यापकांनीही या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा, प्रयोगशाळा व संशोधनासाठी आवश्यक सर्व साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम