
अरे देवा … अमळनेरात प्रौढाचा झाला झोपेत मृत्यू
बसस्थानक परिसरात हळहळ
अमळनेर प्रतिनिधी
उघड्या जागेवर राहणाऱ्या एका ५२ वर्षीय व्यक्तीचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय हेमराज सोनवणे पांचाळ (वय ५२) असे मृताचे नाव असून तो आपल्या आई व दोन मुलांसह जुना बस स्टैंड परिसरात वास्तव्यास होता.
त्याची पत्नी धुळे येथे असते. संजय व त्याची आईयांचा शेती उपयोगी अवजारे बनविण्याचा व दुरुस्तीचा पिढीजात व्यवसाय आहे. अमळनेर शहरात अतिक्रमित जागेत वास्तव्यास असताना पालिकेच्या माध्यमातून तेथील अतिक्रमण काढले गेल्याने हे कुटुंब बेघर झाले होते.मात्र शासनाकडून घरकुलाचा लाभ न मिळाल्याने जुना बस स्टैंड परिसरात रस्त्यालगत त्यांनी चस्तान मांडून तेथेच ते दिवसा व्यवसाय करून रात्री वास्तव्य करत होते. सध्या थंडीचा गारठा वाढल्याने अश्यात संजय यांचा रात्री झोपेतच मृत्यू झाला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम