
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होणार
चहापानावर विरोधकांनी टाकला बहिष्कार
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यपसुन सुरूवात होणार
चहापानावर विरोधकांनी टाकला बहिष्कार
मुंबई वृत्तसंस्थ
सोमवारपासून अर्थात 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला सरकारकडून आयोजित करण्यात येणाऱ्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. विरोधकांकडून सरकारला घेरण्यासाठी तयारी केली आहे. लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी, संतोष देशमुख हत्याकांड, कृषी विभाग घोटाळा, प्रशांत कोरटकर प्रकरणावरून सरकारला घेरणार, असे पत्रकार परिषेदतून दिसून आले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांतील नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा बंगल्यावर पार पडली. यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार भाई जगताप, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील प्रभू, आमदार आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीतील अन्य नेते उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम