अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवले; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवले; गुन्हा दाखल

अमळनेर : तालुक्यातील एका गावात असलेल्या

लग्नातून दोन मैत्रिणी असलेल्या अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवल्याची घटना १० रोजी घडली असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १० रोजी त्यांच्या पुतण्याचे लग्न असल्याने ते लग्न कार्यात मग्न होते. तर त्यांची १४ वर्ष १ महिना वयाची मुलगी व तिची १५ वर्ष ८ महिने वयाची मैत्रीण, या आम्ही नवरदेवाजवळ पारावर जातो म्हणून बाहेर पडल्यात. मात्र, ३ वाजता लग्न लागल्यानंतर ही त्या दिसल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही मुलींच्या आई अन् वडिलांनी आजूबाजूच्या गावात व आपापल्या नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र कोणताही तपास लागला नाही. त्यांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची खात्री झाल्यामुळे त्यांनी अमळनेर पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम