
अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण
एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात लग्नासाठी आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची घटना मंगळवारी (८ एप्रिल) सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी बुधवारी (९ एप्रिल) रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील एका गावातील राहणारी पीडित मुलगी लग्नाच्या निमित्ताने आपल्या नातेवाईकांकडे जळगाव तालुक्यातील एका गावात आली होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून तिला फूस लावून पळवून नेले. तिचे नातेवाईकांनी तिला अनेक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ती न सापडल्याने अखेर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम