
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले
जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरातील घटना
जळगाव : शहरातील फुले मार्केटमध्ये काकूसोबत
आलेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी पाणी पिण्याचे सांगून गर्दीमध्ये कुठेतरी निघून गेली. ही घटना दि. २ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
तरी त्या मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक महेश घायतळ करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम