
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
चाळीसगाव तालुक्यातील घटना
चाळीसगाव प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तोड दाबून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली असून याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान २६सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये संशयित आरोपी दत्तू दिलीप मोरे रा. ता.चाळीसगाव यांनी पीडित मुलगी ही एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्या राहत्या घरात तिच्यावर अत्याचार केला आहे. तसेच इतर दिवशी देखील शेतात आणि इतर भागात देखील धमकी देऊन अत्याचार केला. . दरम्यान ही घटना घडल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार या घटनेबाबत शनिवारी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम