
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती; एकास अटक
जळगाव: शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आल्याचा आणि त्यातून ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शनिवारी, रात्री शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. मागील एक वर्षापासून निखील लीलाधर कोळी (वय २०, रा. मोहन टॉकीजजवळ, जळगाव) याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. या अत्याचारातून पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे १८ जुलै रोजी उघडकीस आले.
या घटनेसंदर्भात पीडित मुलीच्या आईने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी, १९ जुलै रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी निखील कोळी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम