अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात

बातमी शेअर करा...

अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात

जळगाव : संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांबाबत स्वीकारलेल्या जाहीरनाम्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. घुगे म्हणाले, अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडुन राबविण्यात येत असलेल्या योजनांचा / कार्यक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी जागृत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात यशदाचे प्रशिक्षक श्री. आर. अहमद यांनी मौलाना आझाद महामंडळाच्या वतीने अल्पसंख्यांकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे सादरीकरण करून मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा नियोजन समिती, जळगांव यांच्यामार्फत जिल्हास्तरावर अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या शासकीय योजनांची विस्तृत माहिती सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राहुल इधे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. त्याचप्रमाणे जिल्हा व्यवस्थापक, मौलाना आझाद महामंडळ, जळगांव यांच्यामार्फत अल्पसंख्यांक समुदायासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांबाबतही माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात अल्पसंख्यांक समुदायांच्या हक्कांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, जिल्हा व्यवस्थापक पितांबर पाटील, मौलाना आझाद महामंडळ, जळगांव त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचे सहायक जिल्हा नियोजन अधिकारी , राहुल इधे,भरत साळुंखे तसेच इतर विभागांचे अधिकारी/कर्मचारी, अल्पसंख्यांक समुदायातील नागरिक तसेच शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम