अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवण्यात याव्या – शेख अब्दुल रहीम

बातमी शेअर करा...

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवण्यात याव्या – शेख अब्दुल रहीम

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत अल्पसंख्याक आयुक्त यांना निवेदन सादर!

हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन तर्फे नवनियुक्त अल्पसंख्याक आयुक्त प्रतिभा इंगळे यांचा सत्कार!

छत्रपती संभाजीनगर: हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे नवनियुक्त अल्पसंख्याक आयुक्त आयएएस अधिकारी श्रीमती प्रतिभा इंगळे मॅम यांचा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनच्या परंपरेनुसार शाल, पुस्तक आणि पेन देऊन सत्कार करण्यात आले. तसेच सविस्तर चर्चा करून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी खालील योजना राबविण्यात याव्यात जेणेकरून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल यासाठी अल्पसंख्याक विभागाने ठोस उपाययोजना करावी व खालील योजना राबवण्यात याव्या…

१) जिल्हा पातळीवर म्हणजे शहराच्या मुख्य ठिकाणी ही “उर्दू” घरची स्थापना करावी.
२) बार्टी, सारथीच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक “स्वतंत्र” स्वायत्त संस्था निर्माण करावी.
३) 1ली ते 10 वी पर्यंत खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश (युनिफॉर्म) योजना राबविण्यात यावी.
४) अल्पसंख्याक समाजातील 1ली ते 10 वी पर्यंत विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा.
५) 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात यावी.
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी वरील योजना राबविण्यात याव्यात असे निवेदन सादर करण्यात आले. आयुक्त मॅम यांनी सांगितले आपले म्हणणे आणि निवेदन पुढील कार्यवाहिस्त्व मा. सचिव, अल्पसंख्याक विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे सादर करण्यात येईल….

 

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम