अवयवदान, देहदान करून जीवन मोतीमय करा – डॉ.नरेंद्र ठाकूर

रोटरी, सेवारथतर्फे चर्चासत्राचे आयोजन

बातमी शेअर करा...

अवयवदान, देहदान करून जीवन मोतीमय करा – डॉ.नरेंद्र ठाकूर

रोटरी, सेवारथतर्फे चर्चासत्राचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी

आपले जीवन मातीमोल करण्याऐवजी अवयवदान आणि देहदान करून मोतीमय करा असे डॉ.नरेंद्र ठाकूर यांनी आवाहन केले.
गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल, सेवारथ आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान व देहदान या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
चर्चासत्रात सुखकर्ता फाउंडेशनचे डॉ.नरेंद्र ठाकूर, सुप्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉ.अमित भंगाळे, छाया किडनी फाउंडेशनचे किशोर सूर्यवंशी यांनी वक्ते म्हणून सहभाग घेतला.
व्यासपीठावर रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष दिनेश थोरात, मानद सचिव समर्थसिंग पाटील, सेवारथ संस्थेच्या डॉ. नीलिमा सेठिया, दिलीप गांधी, रोटरी मिडटाऊनच्या मानद सचिव किरण सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ.अमित भंगाळे यांनी अवयवदानाचे प्रकार सांगितले. त्यात नैसर्गिक मृत्यू झाल्यास, जिवंतपणी कोणते अवयव आणि ब्रेनडेड झाल्यानंतर कोणते अवयवदान करता येतात याची माहिती दिली. नेत्रदानाची आवश्यकता, त्वचादानाची प्रक्रिया, किडनी व लिव्हर प्रत्यारोपण तसेच ब्रेनडेड व कोमा यातील फरक सविस्तरपणे समजून सांगितला. ही परिस्थिती बदलण्यासाठी जनजागृतीची गरज देखील त्यांनी व्यक्त केली.
देहदान व अवयवदान यातील फरक सांगत डॉ. ठाकूर यांनी देहदानाची पद्धत, प्रक्रिया आणि महत्त्व सांगितले. या विषयात सुशिक्षित व्यक्तींमध्ये देखील अनेक गैरसमज, शंका या योग्य माहितीच्या अभावी असल्याचे उदाहरणे त्यांनी सांगितले. नंतर दोन्ही डॉक्टरांनी शंका निरसन केले.
किडनी प्रत्यारोपण केलेले किशोर सूर्यवंशी यांनी अनुभव कथन केले. त्यांनी गिटारच्या सहाय्याने स्वरचित दिल की सुनो…. किसी का दिल बनो हे गीत सादर केले. खुशी खोंडे या मुलीने जिना इसी का नाम है….या गाण्यावर नृत्य सादर केले.
परिचय गौरव मेहता, डॉ. विवेक वडजीकर, रत्नाकर पाटील यांनी करून दिला. आभार किरण सिंग यांनी
व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम