अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक ; एलसीबीची कारवाई

बातमी शेअर करा...

अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक ; एलसीबीची कारवाई

८ किलोहून अधिक गांजा, दुचाकी आणि मोबाईलसह एकूण २ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी | चोपडा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सत्रासेन–चोपडा रोडवर सापळा रचून अवैध गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ८ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा आणि दुचाकीसह एकूण ₹२,२८,६४० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, सत्रासेनहून चोपडा दिशेने दोन इसम मोटारसायकलवरून गांजाची वाहतूक करणार आहेत. या माहितीच्या आधारे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या सहकार्याने सत्रासेन–चोपडा रोडवर वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यादरम्यान संशयास्पद दुचाकीला अडवून चौकशी केली असता तीवरील दोन्ही इसमांकडे गांजा आढळून आला.

अविनाश साहेबराव डिवरे (वय २६, रा. खोकरी, पो.स्टे बवली, ता. वरला, जि. बडवाणी) आणि रोशन साहेबराव डिवरे (वय ३१, रा. खोकरी, पो.स्टे धवली, ता. वरला, जि. बडवाणी)या फॉगहनना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ किलो १२० ग्रॅम गांजा (किंमत ₹१,७८,६४०) होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र. MP-46-MV-2951, किंमत ₹४०,०००) मोबाईल फोन (किंमत ₹१०,०००) असा एकूण ₹२,२८,६४० मुद्देमाल कापत करण्यात आला आहे.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात CCTNS क्र. ०२५६/२०२५, NDPS अ‍ॅक्ट कलम २०(ब), २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानीय गुन्हे शाखा) आणि पोलीस निरीक्षक मधुकर साळवे (चोपडा शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सपोनि शेषराव नितनवरे, पोउनि जितेंद्र बल्टे, पोह दिपक माळी, पोह रविंद्र पाटील, पोह विलेश सोनवणे, पो.कॉ. रावसाहेब पाटील (स्थानीक गुन्हे शाखा, जळगाव) तसेच चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोह राकेश पाटील, पो.कॉ. मनेष गावीत, पोकॉ. प्रमोद पवार, पोकॉ. तिरुपती खांडेकर, पोकी किरण पारधी यांनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम