अवैध दारू अड्ड्यांवर छापे, २७ जणांना अटक

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

बातमी शेअर करा...

अवैध दारू अड्ड्यांवर छापे, २७ जणांना अटक

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

 

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरातील कंजरवाडा, तांबापुर आणि शिरसोली भागात पोलिसांनी अवैध दारूविक्री आणि हातभट्टी दारू निर्मितीविरोधात मोठी कारवाई केली. पोलिसांनी २७ जणांना अटक केली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन उपद्रव करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस पथकांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ११ पोलीस अधिकारी, ४८ पोलीस अंमलदार, २२ होमगार्ड आणि RCP-QRT पथक सहभागी होते.

छापेमारी आणि जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

पोलिसांनी पहाटेच्या वेळेत छापेमारी करत २७ संशयितांना ताब्यात घेतले. या छापेमारीत १०,०१५ लीटर दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹७,०१,६२० इतकी आहे. जप्त दारू आणि साहित्य तत्काळ नष्ट करण्यात आले.

सर्व संशयित आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाने अशा प्रकारच्या अवैध कारवायांच्या विरोधात कठोरपणे कारवाई सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम