
अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले
अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले
शनिपेठ पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी जुन्या जळगाव परिसरातील पांझरापोळ चौक येथून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी, ४ डिसेंबर रोजी पहाटे कारवाई करत वाहन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री गस्त सुरू असताना पहाटे सुमारास डंपर क्रमांक एमएच-१९-झेड-३१९२ हा संशयास्पद स्थितीत दिसला. वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. चालकाकडे आवश्यक परवानगीपत्र नसल्याने वाहन ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, संबंधित चालकाविरोधात वाळू तस्करीसंदर्भातील गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास शनिपेठ पोलीस करीत आहेत.
=================

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम