
अवैध सावकारी प्रकरणात धरणगावच्या बांधकाम व्यावसायिकाला क्लीन चीट
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल केला होता अर्ज
अवैध सावकारी प्रकरणात धरणगावच्या बांधकाम व्यावसायिकाला क्लीन चीट
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल केला होता अर्ज
धरणगाव / प्रतिनिधी
शहरातील बांधकाम व्यावसायिक असलेले निखिल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक असलेले सुनील चौधरी आणि त्यांच्या पत्नी अनिता चौधरी यांच्याविरुद्ध अवैध सावकारी बाबत जिल्हा उपनिबंधक न्यायालयात जळगावच्या मनोज वाणी, कल्पना वाणी आणि तिलोत्तमा इंगळे यांनी दिली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अवैध सावकारी धाड पथक यांनी धरणगाव येथील सुनील चौधरी यांचे घरी आणि कार्यालयात दस्ताऐवजांची चौकशी करून त्यात पथकाला कुठलेही आक्षेपार्ह दस्ताऐवजज आढळून आले नाही.
याबाबत माहिती अशी की जळगाव येथील रहिवासी असलेले मनोज लीलाधर वाणी, कल्पना मनोज वाणी आणि तिलोत्तमा दीपक इंगळे यांनी सुनील चौधरी, अनिता चौधरी यांच्याविरुद्ध 24 डिसेंबर 2024 रोजी तक्रार दिली होती. तक्रारीत मनोज वाणी यांनी ते आर्थिक अडचणीत असल्यामुळे एप्रिल 2023 रोजी शेती आणि व्यवसायासाठी त्यांनी सुनील चौधरी यांच्याकडून 20 लाख रुपये तीन टक्के व्याजाने घेतले असल्याचे म्हटले होते. सुनील चौधरी आणि अनिता चौधरी यांनी कर्जाऊ रक्कम पोटी सुरक्षितता म्हणून नाममात्र खरेदीखत 15 मे 2023 रोजी करून घेतले होते. कर्ज फेड वेळोवेळी दिले. मात्र खरेदीखत चौधरी दांपत्यांनी खरेदी खत पलटवून देण्यास नकार दिल्यामुळे आणि करारनामाच्या आधारे कारवाई करण्याची धमकी दिली. त्यामुळे मनोज वाणी यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
जिल्हा उपनिबंधक सह. संस्था यांच्या कार्यालयीन आदेशानुसार सावकारी / अवैध सावकारी धाड पथक नियुक्त २२ जानेवारी २०२५ रोजी नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसार पथकातील प्रमुख गणेश देशमुख, सौ. साळुंखे, हेमंत पाटील , विजय पवार यांच्या पथकाने पंच सुरेश रमेश पाटील,संजय नामदेव पाटील,यांचे पथक सुनील चौधरी यांच्या धरणगाव येथील निखिल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स येथे गेल्यानंतर गैर अर्जदार यांना येण्याचे कारण सांगून दस्तावेज सादर करण्यासाठी महाराष्ट्र सावकारी नियम अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये दुपारी नोटीस देण्यात आली. यानंतर कार्यालयाची तपासणी केली असता अवैध सावकारीच्या अनुषंगाने पथकाला कोणतेही दस्तावेज आढळून आले नाही असे पत्र स्वाक्षरीनिशी पथक प्रमुखांसह सदस्यांनी दिले.
तर दुसर्या पथकाचे प्रमुख डी .व्ही. पाटील, एन शिंदे,एम बी साठे, अनुजा बाविस्कर यांचे पथकाने पंच म्हणून विजय धनगर,रवींद्र पाटील यांना घेऊन गैर अर्जदार सुनील चौधरी यांच्या घरी चिंतामणी मोरया नगर येथे गेले असता सुनील मधुकर चौधरी , अनिता सुनील चौधरी , यांना बोलावून पथकाने अवैध सावकारी बाबत नोटीस देऊन घरात प्रवेश करून काही कागदपत्रे जप्त केली. मात्र पथकाला तपासणी दरम्यान कुठलेही दस्तावेज आढळून आले नसल्याने चौधरी दाम्पत्य विरुद्ध काहीही निष्पन्न झाले नाही .
दरम्यान सुनील चौधरी यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात सुनील चौधरी या बांधकाम व्यावसायिकाची जुन्या घराच्या सौदा पावतीनंतर १ कोटी १५ लाख रुपये घेउन मिळकत खरेदीसाठी टाळाटाळ करून फसवणूक केल्याचा प्रकार घडला असून पैसे परत मागितल्यावर त्यांना जिवेठार मारण्याची धमकीही देण्यात आली. हा प्रकार १५ मे २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडला. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मनोज लीलाधर वाणी, कल्पना मनोज वाणी (दोघेही रा. जिल्हा परिषद कॉलनी), शैलेंद्र हेमचंद्र भिरुड, हेमलता उर्फ तनुजा शैलेंद्र भिरुड (दोघेही रा. महाबळ कॉलनी), तिलोत्तमा दीपक इंगळे, दीपक पीतांबर इंगळे (दोघेही रा. मामलदे, ता. चोपडा), संदीप हरिभाऊ पाटील (रा. श्रीकृष्ण कॉलनी), राजेंद्र गोपाळ सावदेकर (रा. आसोदा, ता. जळगाव), शेखर भास्कर भिरुड, शिरीष भास्कर भिरुड, नरेंद्रकुमार दत्तात्रय भिरुड, ज्ञानेश्वर दत्तात्रय भिरुड, गौरव कृष्णा भिरुड (सर्व रा. महाबळ कॉलनी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) शीतलकुमार नाईक करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम