“अॅग्रो सिटी पार्क” प्रकल्पासाठी सहमतीची विनंती : अंबरनाथमध्ये उभा राहणार भव्य सार्वजनिक उद्यान!

बातमी शेअर करा...

“अॅग्रो सिटी पार्क” प्रकल्पासाठी सहमतीची विनंती : अंबरनाथमध्ये उभा राहणार भव्य सार्वजनिक उद्यान!

अंबरनाथ (प्रतिनिधी) – अंबरनाथ शहरात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प साकारत असताना, आता शहरात आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभा राहत आहे. शेतकी सहकारी सोसायटीच्या आरक्षित 15 ते 60 एकर जागेत “अॅग्रो सिटी पार्क” या भव्य आणि आधुनिक सार्वजनिक उद्यानाची संकल्पना आकार घेत आहे.

या संदर्भात माजी नगराध्यक्ष आणि शेतकी सहकारी सोसायटीचे नामनिर्देशित सदस्य श्री. सुनिल वामन चौधरी यांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सहकार्याची विनंती केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दूरदृष्टीतून अंबरनाथ शहरात राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत. शिवमंदिर परिसराचा कायापालट, नाट्यगृह, शैक्षणिक-सामाजिक व क्रीडासुविधा यासारखी अनेक विकासकामे गतिमान झाली असून, त्यातच या भव्य “सिटी पार्क” प्रकल्पाची भर पडणार आहे.

चौधरी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, या प्रकल्पासाठी खासदार साहेब निधी देण्यास उत्सुक असून, शहराचा विकास व दर्जा वाढवण्यासाठी हा प्रकल्प मोलाचा ठरेल. त्यामुळे शेतकी सहकारी सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देऊन सहमती द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

जर सहमती मिळाल्यास अंबरनाथ शहरात “अॅग्रो सिटी पार्क” या नावाने एक आधुनिक आणि नागरिकांना उपयुक्त असं भव्य उद्यान विकसित होणार असून, हे शहराच्या विकासात एक नवीन मैलाचा दगड ठरेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम