
अॅड. वीरेंद्र पाटील यांचे गुलाबराव पाटील यांच्या स्विय सहाय्यकांकडून अभिनंदन
अॅड. वीरेंद्र पाटील यांचे गुलाबराव पाटील यांच्या स्विय सहाय्यकांकडून अभिनंदन
जळगाव वकील संघाच्या सचिवपदी विजयाबद्दल नवलसिंगराजे पाटील यांनी दिल्या शुभेच्छा
जळगाव: जळगाव जिल्हा वकील संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सचिवपदी विजयी झालेले अॅड. वीरेंद्र एम. पाटील यांचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांचे स्विय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
या भेटीदरम्यान, नवलसिंगराजे पाटील यांनी अॅड. पाटील यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी दोडे गुर्जर संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, कवी प्रफुल्ल नाना पाटील, दिलीप आबा पाटील आणि सचिन पाटील हे देखील उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम