
अ. भा. गुर्जर महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड
अ. भा. गुर्जर महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड
शहादा : अखिल भारतीय गुर्जर महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक नवी दिल्लीतील न्यू महाराष्ट्र भवन येथे पार पडली असून, या बैठकीत सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन व समाजाचे ज्येष्ठ नेते दीपक पुरुषोत्तम पाटील यांची पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
कार्यकारी अध्यक्ष आणि माजी आमदार गोपीचंद गुर्जर यांनी दीपक पाटील यांच्या फेरनिवडीचा प्रस्ताव मांडताच सर्वानुमते तो मंजूर झाला. पुढील पाच वर्षांमध्ये संस्थेची व्याप्ती वाढविण्यासोबतच महिला आणि युवा आघाडी अधिक बळकट करण्यावर भर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
डिजिटल गुर्जर डेटाबेसला हिरवा कंदील
गुर्जर समाजाची देशभरातील वास्तविक आणि संगठित आकडेवारी तयार करण्यासाठी ‘डिजिटल गुर्जर डेटाबेस’ या महत्वाकांक्षी योजनेलाही बैठकीत मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर समाजातील प्रत्येक कुटुंबाची एकीकृत नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीस राष्ट्रीय पदाधिकारी सुधीर बैंसला, बच्चू सिंह बैंसला, गोपाल सिंह गुर्जर, स्वर्ण सिंह गुर्जर, डी. एन. सिंह, राकेश चौधरी, ईश्वर सिंह, राकेश गुरु, डॉ. आर. एन. गुर्जर, तसेच महाराष्ट्रातून सुनील सखाराम पाटील, अॅड. हिमांशू गुर्जर, अनूप बैंसला, जगदीश पटेल, ओमपाल सिंह खटाना, अजय गुर्जर आणि डॉ. मनोज कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम