आंघोळ करताना तरुणाचा मृत्यू ; शिरूड येथील घटना

बातमी शेअर करा...

आंघोळ करताना तरुणाचा मृत्यू ; शिरूड येथील घटना

अमळनेर – तालुक्यातील शिरूड गावात २४ वर्षीय तरुणाचा आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलेला असताना अचानक मृत्यू झाल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी घडली असून या प्रकरणाची अमळनेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. शिरूड येथील रहिवासी मयूर नरेंद्र पाटील हा सकाळी सुमारे १० वाजता आंघोळीसाठी गेला मात्र बराच वेळ झाला तरी बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला असता मयूर आतच बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. तत्काळ त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मयूर हा ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र राजाराम पाटील यांचा एकुलता एक मुलगा असून अभ्यासू व मनमिळावू स्वभावामुळे गावात त्याची ओळख होती. अचानक झालेल्या या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असून शिरूड गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिंदे करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम