
आंघोळ करताना पाय घसरून पडल्याने मामा भाच्याचा बुडून मृत्यू
आंघोळ करताना पाय घसरून पडल्याने मामा भाच्याचा बुडून मृत्यू
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील तापी नदी पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (२१ मे) सकाळी घडली. नदीपात्रात पाय घसरून दोघेही पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जालना येथून देवकार्याच्या निमित्ताने भुसावळमध्ये आलेले रामराजे नंदलाल नाटेकर (वय ४७) आणि त्यांचा भाचा आर्यन गाळे (वय १८) हे बुधवारी सकाळी अंघोळीसाठी राहुल नगरजवळील तापी नदी पात्रात गेले होते. अंघोळ करताना अचानक पाय घसरल्याने दोघेही खोल पाण्यात बुडाले. काही वेळातच परिसरात ही घटना समजताच मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची नोंद भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या घटनेमुळे रणधीर कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम