आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शानबाग शाळेचा विजय, भावेश पाटील ठरला सर्वोत्तम खेळाडू

बातमी शेअर करा...

आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शानबाग शाळेचा विजय, भावेश पाटील ठरला सर्वोत्तम खेळाडू

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या वतीने गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज मैदानावर सुरू असलेल्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शनिवारी १४ वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय आणि मनपा स्तरीय गटातील सामने रंगले.

जिल्हास्तरीय अंतिम सामन्यात शानबाग स्कूल, जळगावने शेवटच्या तीन मिनिटांत केलेल्या निर्णायक गोलमुळे लॉर्ड गणेशा स्कूल, जामनेरवर १-० असा रोमांचक विजय मिळवत विजेतेपद पटकावले. तर उपविजेतेपद लॉर्ड गणेशाकडे गेले. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान शानबागचा भावेश पाटील याला मिळाला.

पारितोषिक वितरण समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष (अल्पसंख्यांक) मजहर पठाण, हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा डॉ. अनिता कोल्हे व संघटनेचे सचिव फारुक शेख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना पदक व प्रमाणपत्रे देण्यात आली.

मनपा स्तरीय गटातील अंतिम सामना रविवारी पोदार स्कूल विरुद्ध ओरियन सीबीएसई स्कूल यांच्यात खेळवला जाणार आहे.

स्पर्धेतील प्रमुख निकाल:

🔹 १४ वर्षाखालील मुले – जिल्हास्तर

शानबाग स्कूल, जळगाव (विजेते)

लॉर्ड गणेशा स्कूल, जामनेर (उपविजेते)

सर्वोत्कृष्ट खेळाडू – भावेश पाटील (शानबाग स्कूल)

🔹 १४ वर्षाखालील मुले – मनपा

अंतिम सामना : पोदार स्कूल, जळगाव विरुद्ध ओरियन सीबीएसई स्कूल (रविवारी)

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम