आंतरशालेय सुब्रतो फुटबॉल चषक : ओरियन सीबीएसईचा अटीतटीचा विजय

बातमी शेअर करा...

आंतरशालेय सुब्रतो फुटबॉल चषक : ओरियन सीबीएसईचा अटीतटीचा विजय

रोझलँड उपविजेता, पोद्दार इंटरनॅशनलने तृतीय क्रमांक पटकावला

जळगाव / प्रतिनिधी – जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव महानगरपालिका आणि जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी फाउंडेशन पुरस्कृत आंतरशालेय सुब्रतो फुटबॉल स्पर्धा गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर रंगतदार ठरली. १५ वर्षे वयोगटातील अंतिम सामन्यात ओरियन सीबीएसई शाळेने रोझलँड स्कूलचा सडन डेथमध्ये ४–३ ने पराभव करत अजिंक्यपदावर मोहोर उमटवली.

तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात पोद्दार इंटरनॅशनल शाळेने सेंट जोसेफ स्कूलचा ६–० असा दणदणीत पराभव केला.


उद्घाटन सोहळा उत्साही आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीने सजलेला

या स्पर्धेचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे संचालक डॉ. वैभव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईकफुटबॉल असोसिएशनचे सचिव फारूक शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विद्या इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी रोहन सुनील विसावे याने पारंपरिक पद्धतीने नारळ वाढवून क्रीडांगण पूजन केले.

डॉ. वैभव पाटील यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले, तर नाणेफेक रवींद्र नाईक यांनी केली.


विजेत्यांना पदक व गौरव

स्पर्धेतील विजयी, उपविजयी व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघातील सर्व खेळाडूंना स्पोर्ट्स हाऊस, जळगावचे आमीर शेख यांच्या वतीने सुवर्ण व रजत पदक देण्यात आले.

पारितोषिक वितरण समारंभात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, फारूक शेख, क्रीडा अधिकारी सचिन निकम, छाया बोरसे, जयंत जाधव, राहील अहमद, वसीम चांद, साबीर अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारूक शेख यांनी केले तर आभार जयंत जाधव यांनी मानले.


महत्त्वाचे सामने – निकाल थोडक्यात :

  1. एल. एच. पाटील विजयी – विवेकानंद प्रतिष्ठान ४:२

  2. सेंट जोसेफ विजयी – उज्वल स्कूल ४:०

  3. ओरियन सीबीएसई विजयी – इकरा सालारनगर १:०

  4. पोद्दार इंटरनॅशनल विजयी – विद्या स्कूल ३:२

  5. सेंट जोसेफ विजयी – गोदावरी स्कूल १:०

  6. रोझलँड विजयी – एच.एल.एस. पाटील स्कूल ३:०

  7. ओरियन सीबीएसई (पेनल्टी) – सेंट जोसेफ ७:६

  8. रोझलँड (पेनल्टी) – पोद्दार इंटरनॅशनल ४:२

  9. तृतीय स्थान: पोद्दार विजयी – सेंट जोसेफ ६:०

  10. अंतिम सामना: ओरियन सीबीएसई (पेनल्टी) – रोझलँड ४:३

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम